डोंबिवली तील विनायक व सुजाता पाटील यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून ५ लाखांचा धनादेश शिवसेने कडे सुपूर्द

  डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोकण व पश्चिम महाराष्ट्र येथील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीचा ओघ सुरु केला आहे. आहे.          मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावर जनतेनेही मदतीचा हात पुढे केला आहे.डोंबिवली पुर्वेकडील चोळेगाव येथील उद्योगपती विनायक पाटील यांनी पत्नी सुजाता  यांच्या वाढदिवसानिमित्ताने पूरग्रस्तांना तब्बल पाच लाख रुपयांचा धनादेश डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याकडे सुपूर्द केला.          यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,माजी नगरसेवक तात्या माने,राजेश कदम, दीपक भोसले,गजानन व्यापारी, सचिन जोशी,स्वप्नील जोशी आदि पदाधिकारी उपस्थित होते.डोंबिवली पूर्वेकडील चोळेगाव मधील उद्योगपती विनायक पाटील यांनी पत्नी सुजाता यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्त तब्बल पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.यावेळी शिवसेना शहरप्रमुख मोरे म्हणाले, शिवसेनेकडून भरपूर मदत केली जात आहे.       डोंबिवली शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना १० हजार कीटचे ( समान ) वाटप करणार आहे. त्यातील एक हजार कीटसाठी लागणारी रक्कम रुपये पाच लाख रुपयांचा धनादेश विनायक पाटील व त्यांची पत्नी सुजाता पाटील यांनी शिवसेनेकडे सुपूर्द केली.राजेश कदम म्हणाले,अश्या प्रकारची मदत करून एक वेगळा पायंडा पाटील दाम्पत्यांनी पडला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.       तर विनायक पाटील म्हणाले, खर तर ५० वा वाढदिवस मोठय उत्साहात करणार होतो. परंतु शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यं उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे आम्ही वाढदिवस मोठ्या थाटातमाटात न करता पूरग्रस्तांना मदत केली.

Post a Comment

0 Comments