पर्यटकांना वाचविणाऱ्या पोलीस, अग्निशमन दल कर्मचाऱ्यांचा राष्ट्रवादीने केला सन्मान
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर मध्ये ११८ पर्यटकांना वाचविणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अग्निशामक दलातील कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.       खारघर येथील पांडव कडा आणि त्यांच्या आजुबाजुच्या परिसरामध्ये पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी पोलीस यंत्रनेकडून पूर्णता बंदी आहे. खारघरची लोकसंख्या जवळपास चार लाखाच्या आसपास आहे. शिवाय या ठिकाणी खारघर लगत असणाऱ्या शहरांमधुन मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. बंदी असल्यामुळे पोलीसांसोबत  नेहमी वादविवाद होतात. काही लोक अतिशय धोकादायक मार्गाने डोगर किंवा वाहत्या पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. अश्या प्रकारामुळे पांडव कड़ा येथे १६ लोकांचा मृत्यु झाला आहे.१८ जुलै रोजी खारघर सेक्टर ५ (गोल्फ कोर्स) येथील डोंगरावर ११८ लोक फसले आहेत अशी माहिती खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शत्रुघ्न माळी यांना प्राप्त झाली. त्यांनी क्षणाचाही  विलंब नकरता आपले सहकारी आणि अग्निशामक दलाचे  अधिकारी आणि त्यांचे सहकारी यांना घेऊन स्वताचा  जीव धोक्यात घालून या सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढले.त्यांच्या या कामाचे कौतुक  करण्यासाठी खारघर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आर.एन यादव यांच्या सहकार्याने उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने महाराष्ट्र योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस व पनवेल शहर महिला निरीक्षक भावना घाणेकर, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक पनवेल महानगर पालिका सतीश पाटील यांच्या हस्ते सर्वाना सन्मान पत्र देण्यात आले.        यावेळी पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस रामदास नारकर, पनवेल शहर सचिव अमित पडवळपूनम ढाले, पनवेल जिल्हा उपाध्यक्ष शितल शिंदे, राष्ट्रवादीचे नेते संतोष शेट्टी, खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम, खारघर महिला सचिव सुनीता पेटकर, महेश शिंदे, आकाश शिंदे, दीपक पवार, विवेक जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्मासाठी पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आर.एन. यादव यांचे मोठे योगदान लाभले असल्याची माहिती कार्यकर्ते मनोहर सत्रे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments