हेलिपॅड असलेल्या 'मोहन अल्टिझा' विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

 


वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मोहन ग्रुपच्या अडचणीत वाढ..

कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  हेलीपँड असेलेली मोहन अल्टिझा’ ही इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  मोहन ग्रुपने बांधलेल्या  मोहन अल्टिझा’ या इमारती बाबत मुंबई न्यायालयात याचिका दाखल झाल्याने इमारत बांधणारा मोहन ग्रुप अडचणीत आला असल्याचे दिसून येत आहे. कल्याण मधील हेलिपॅड असलेली इमारत म्हणून प्रसिद्ध  असलेली  मोहन अल्टिझाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आल्यानेमोहन ग्रुपच्या भागीदारांसह या इमरातीवर कारवाईची टांगती तलवार लटकत असल्याचे दिसून येत आहे. याचिकाकर्ते महेश लालचंदानीलाइफ स्पेस एलएलपी (मोहन ग्रुप) चे अध्यक्षजितेंद्र लालचंदानी यांचे सख्खे बंधू आहेत. महेश लालचंदानी यांनी ही याचिका दाखल केली आहे. ते देखील एक बिल्डर असून बांधकाम क्षेत्रातील बारकावे त्यांना तपशीलासह माहिती असल्याने जितेंद्र लालचंदानी यांनी मोहन अल्टिझाच्या बांधकामात काय काय काळे पांढरे केले आहे हे महेश लालचंदानी यांना चांगलेच ठाऊक आहे.  म्हणून आता या बाबत आता मुंबई हायकोर्टात याचिका झाल्याने जितेंद्र लालचंदानी या सह कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) अधिकारीही अडचणीत येऊ शकतात असे या बाबत बोलले जात आहे.याचिकाकर्ते महेश लालचंदानी यांनी २५ जून २०२१ रोजी ही रिट याचिका (क्रमांक -२१६५ / २०२१) दाखल केली आहे. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती राजेश लोढा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.  महत्त्वाचे म्हणजे डिव्हिजन खंडपीठाने ही याचिका मान्य केली असून पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.  या बाबत जितेंद्र लालचंदानी यांना दोन आठवड्यांत उत्तर आणि प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागणार आहे. या याचिकेत याचिकाकर्ते महेश लालचंदानी यांनी केडीएमसीने 'मोहन अल्टिझा'मध्ये करण्यात आलेली बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करावीत आणि जितेंद्र लालचंदानी आणि भागीदारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या याचिके द्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.या केलेल्या याचिकेत  याचिकाकर्ते महेश लालचदानी यांनी म्हटले आहे कीमोहन ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र लालचंदानी यांनी कल्याण (पश्चिम) मधील गांधारे गावात ११ लाख चौरस फूट क्षेत्रातील विकसित मोहन अल्टिझा’ या गृहसंकुलात अडीच लाख चौरस फूट बेकायदेशीररित्या बांधकाम केले आहे.  जितेंद्र लालचंदानी यांनी क्रमांक १- सर्व्हे नंबर १//५ आणि २//१ सारख्या इमारतीच्या बांधकामाच्या कोणत्याही नियम-कायद्यांचे पालन केले नाही. 
 सुधारित इमारत परवानग्या (सुधारित बांधकाम) देखील केडीएमसीने नाकारले आहेत.  बाजार भावानुसार जितेंद्र लालचंदानी यांनी बेकायदा बांधकामांमधून २०० कोटी रुपये अतिरिक्त मिळवले आहेत.  या संपूर्ण प्रकल्पाची किंमत १००० कोटी रुपये आहे असे या याचिकेत म्हटले आहे. महेश लालचंदानी यांनी एमआरटीपी कायद्यान्वये आणि आयपीसीच्या इतर कलमांनुसार फसवणूक केल्याबद्दल सर्वांवर कारवाई करण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments