ज्येष्ठ शिवसैनिकाचे पूरग्रस्तांना सहाय्य

 डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील पश्चिमे कडील देवीचा पाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि जगदंबा नगर येथील हवालदिल झालेल्या पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  येथील स्थानिक शिवसैनिक  सुर्यकांत म्हसकर  या  शिवसैनिकांची मोलाची मदत झाली. पूरग्रस्त बोटीत बसत असताना बोट  कलंडू नये यासाठी तब्बल सहा तास छातीभर पाण्यात सुर्यकांत म्हसकर  बोट हाताने घट्ट धरुन ठेवत होते.           त्यांच्या या कार्याची चर्चा दिवस भर कौतुकौचा विषय होता.सकाळी खाडीचे पाणी चाळीमध्ये शिरत असल्याचे पाहून  म्हसकर यांनी येथील नागरिकांना मदत करण्याचे ठरविले., विशेष म्हणजे म्हसकर यांना मधुमेह असतानाही त्यांनी जीवाची पर्वा न करता मदत केली.येथील लोकांना मदत करत असताना त्यांच्या पायाला जखम झाली होती.          या शिवसैनिकाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करून कौतुक करावे अशी मागणी नागरिकांनी करत आहे.

Post a Comment

0 Comments