कल्याण डोंबिवलीत ११६ नवे रुग्ण तर १०५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ११६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.आजच्या या ११६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ४४८ झाली आहे. यामध्ये १०२९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३३ हजार १९५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६कल्याण प – ३८डोंबिवली पूर्व  ३४, डोंबिवली पश्चिम – ११मांडा टिटवाळा – , मोहना – २, तर पिसवली येथील १ रुग्णाचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments