पू. ल. कट्टा साजरी करणार लोककवी वामनदादा कर्डक यांची जन्म शताब्दी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सांगते ऐकाया गाजलेल्या मराठी चित्रपटातील  "सांगा या वेडीलामाझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला" तसेच आकाशवाणीवर गाजलेले "ह्यो ह्यो पाहूणा, सखूचा मेव्हणासखूकड बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग. किंवा  उद्धरली कोटी कुळे भिमातुझ्या जन्मामुळे या गाजलेल्या  चित्रपट तसेच लोकगीतांचेभीम गीताचे गीतकार लोककवी वामनदादा कर्डक यांची जन्मशताब्दी १५ ऑगस्ट २१ पासून सुरू होत आहे हे जन्मशताब्दी वर्ष पू .ल .कट्टा कल्याणच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे ठरविले आहे.            पू .ल .कट्टा हि संस्था कला,साहित्य,संस्कृती क्षेत्रात कार्य करते.  त्यामुळे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या साहित्यावर  व जीवनावर आधारित विविध कार्यक्रम आयोजित करून हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे योजिले आहे.  त्याबाबत त्यांच्या चाहत्यांची एक प्राथमिक बैठक शनिवारी कल्याण प येथे आयोजित करण्यात आली आहे. 

      

          

            या बैठकीत कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ही जनशताब्दी कशी साजरी करता येईल व कोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करावे या बाबत विचार विनीमय करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्याचे योजिले आहे.इच्छुक वामनदादा कर्डक प्रेमींनी या बैठकी करिता उपस्थित राहावे असे आवाहन पू ल कट्टा अध्यक्ष प्रा महेंद्र भावसार यांनी केले आहे. अधिक माहिती साठी ९८३३५५५३९९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे पू .ल .कट्टा संयोजक यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments