दिवा व कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीन दोस्त; महापालिकेची धडक कारवाई


■अनधिकृत बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईची छायाचित्रे. 


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई  सुरुच असून आज दिवा आणि कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.


        दिवा प्रभाग समितीमधील अली खान यांचे 60 × 90  मापाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. तर कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव येथील सुमारे 2000 चौरस फुटाचे 36 कॉलमचे बांधकाम तसेच तळ अधिक 6 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.

       

       सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अलका खैरे आणि प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.

 

Post a Comment

0 Comments