कल्याण मधील मुस्लिम बांधवांचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात


■तब्बल ११ टन जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागात पाठवणार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील मुस्लिम बांधव पूरग्रस्त चिपळूण, महाड, रत्नागिरी भागात अन्नधान्य, औषध, कपडे अशी  मदत घेऊन जाणार आहेत. कोरोना काळात या टीमने रेहबर ग्रुप ची स्थापना करत  कोरोना काळात गरजूंना मोफत औषध मोफत ऑक्सिजन सुविधातसंच लाँकडाऊन  काळात गरजवंतांना अन्नधान्य वाटप देखील केले होते.  महाड येथे झालेल्या पूर परिस्थिती मध्ये बाधित नागरिकांसाठी रेहबर ग्रुप पुन्हा एकदा मदतीचा हात देत मदतीला धावला आहे.



 समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करणाऱ्या कल्याण पश्चिमेकडील मुस्लिम मोहल्ल्यातील तरुणांकडून सामाजिक आदर्श  पायंडा घालून दिला जात आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात गेल्या आठवड्यात महापूर आल्यानंतर इतराप्रमाणेच कल्याणातील मुस्लीम तरुणांचा रेहबर ग्रुप देखील मदतीसाठी सरसावला आहे. या तरुणांनी दोन दिवसात पूरग्रस्त भागातील नागरिकासाठी औषधेअन्नधान्य, आथंरूणमहिलासाठी सॅनिटरी नॅपकिन्स, कपडे यासारखे ११ टन साहित्य गोळा केले आहे.


कोरोना काळापासूनच या  तरूणाचा  या ग्रुपने मदतीसाठी पुढाकार घेतला असून कोरोना काळात गरीब गरजू रुग्णाना बिले भरण्यासाठी मदत करणेमोफत ऑक्सिजन सिलेडर उपलब्ध करून देणे यासारखी मदत रेहबर ग्रुप करत आहे. या ग्रुप मधील अहमद कांबळे यांनी तर या मदतीसाठी स्वताची चारचाकी गाडी विकून त्यातून आलेल्या पैशातून ऑक्सिजन सिलेडर खरेदी केले. कल्याण पासून बदलापूर पर्यत हा ग्रुप काम करत असून यात विद्यार्थी. व्यावसायिकनोकरदार तरुणाचा समावेश असल्याची माहिती अब्दुल गफ्फार शेख यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments