अलका सावली प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने बेतूरकर पाडा परिसरात लसीकरण सुरु


■पहिल्याच दिवशी ३५० नागरिकांचे झाले लसीकरण...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले  यांच्या प्रयत्नाने कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरातील कै. बापूराव आघारकर शाळेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.  कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून शासनाने देखील काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास सुरवात केली आहे. असे असले तरी कोरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी कल्याण मधील अलका सावली प्रठीष्ठान प्रयत्नशील आहे. बेतूरकर पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असून येथील नागरिकांना लसीकरणासाठी इतरत्र धाव घ्यावी लागत होती. इतर केंद्रावर होणारी गर्दी, यामुळे नागरिकांचा बराचसा वेळ लसीकरणाच्या रांगेत जात होता.नागरिकांची हि समस्या लक्षात घेऊन अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले यांनी बेतूरकर पाडा परिसरात लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या या मागणीनुसार पालिकेने बेतूरकर पाडा येथील कै. बापूराव आघारकर शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली आहे. आज पासून हे केंद्र सुरु झाले असून आज पहिल्याच दिवशी परिसरातील ३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आगामी काळात देखील हे लसीकरण केंद्र सुरु राहणार असून नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन सुधीर वायले यांनी केले आहे.       दरम्यान या लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या सुविधेसाठी यश महाजन, सागर वाघ, आकाश वायले, बंड्या कराळे, शरद शेलार, अजय पवार, अनिकेत वायले, तुषार देशमुख, सत्यम पाटील, मितेश बाऊस्कर, वैभव देशमुख, स्वप्नील गुरव आदींसह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Post a Comment

0 Comments