उल्हासनदी वरील पुल झाडा - झुडपाच्या विळख्यात

                                                                                 कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील ग्रामीण प्रभाग क्षेत्राला जोडणाऱ्या एकमेव असण्याऱ्या उल्हास नदीवरील पुलाच्या खांबाच्या कमानी लगत झाडे-झुडपे फोफवत असल्याने पुलाची दुरावस्था झाली आहे. एन.आर.सी. कंपनीने १९४२ साली उल्हास नदीवर साधरण १६० मीटर लांब २५मीटर ऊंच ७मीटर रूंदीच्या रस्त्याच्या पुलाची स्टोन आर्च मेशेनरी ब्रीज प्रकारची बांधणी आहे.

                                                       

कल्याण शहरास मोहने, वडवली, अटाळीआंबिवली, गाळेगाव, ऊबर्णी, मोहीली, बल्याणीटिटवाळा आदी ग्रामीण परीसर या पुलामुळे दळवण- वळणाच्या दुष्टीकोनातून जोडला गेला आहे. कल्याण डोंबिवली मनपाने सन २००५ च्या सुमारास लाखो रुपये खर्चून पुलाची डाग-डुजी केली. सध्यास्थितीत पुलावरून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या जलवहिनीचे सिमेंट क्राँक्रीट छोटेखानी खांबामुळे पुलाचा भाग अरूंद होत असल्याने ती जलवाहिनी शिफ्ट करावी जेणे करून पुलाचा रस्ता रूंद होण्यास मदत होईल. उल्हास नदीवरील पुलाच्या खांबाच्या कमानी लगत वृक्ष वल्ली फोफवत आहे. त्यामुळे तडा जाऊन पुलास संभाव्य धोका र्निमाण होऊ शकतो.  प्र.क्र.०६ शिवसेना नगरसेविका हर्षाली थवील यांनी उल्हासनदीच्या या पुलाच्या दुरावस्थेबाबत व पुलाच्या खांबाच्या कमानी लगत फोफवत असलेल्या झाडे-झुडपे बाबत संभाव्य दुर्घटना  घडण्या अगोदर डागडुजी करण्यात यावी तसेच प्रस्तावित उल्हास नदीवरील नवीन पुलाचा प्रश्न मार्गी लावणे बाबत क.डो.म.पा आयुक्तांना पत्र देऊन साकडे घातले आहे.          संदर्भात पुलावरील जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईन जे.एन्.यु.अंतर्गत टाकलेल्या पाईप लाईनच्या बरोबरीने पुलाच्याखालील बाजूने शिफ्ट केली असती तर पुलावर जागा जास्त मिळाली असती व पुलाचा कठडा व जलवाहिनीच्या गँप् मद्ये झुडपे वाढली नसती असे जाणकारांचे मत आहे. उल्हास नदी व बारावे खाडी यांच्या क्षेत्रातील हा शेवटच्या टप्यातील पुल असून उल्हास खोरेतून पावसाळ्यात येणारे पाणलोट क्षेत्र पाहता पुलाच्या धोक्याची पातळी पाण्याची यंत्रणा देखील या पुलावर २००६ च्या पुर परिस्थिती नंतर आता तरी देखील कार्यन्यीत करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.                याबाबत शहर आभियंता  सपना कोळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीपुलाच्या खाबांलगत वाढलेली झुडपाची  छाटणीच्या कामाबाबत टेंडर मंजूर झाले असुन पाऊस कमी झाल्यास तातडीने काम सुरू करणार आहोत. पुलाचे स्ट्रक्चर अँडीट केले असुन स्ट्रक्चर अँडीट रिपोर्ट नुसार पुल धोकादायक नाही. पुलावरून जाणरी जलवाहिनी शिफ्टिंग संदर्भात पाहणी करणार असल्याचे सांगितले."

Post a Comment

0 Comments