भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जि.) व नवयुग मित्र मंडळ यांच्या वतीने पुरग्रस्तांना एक हात मदतीचा...


 ठाणे, प्रतिनिधी  :  कोकणातील जनतेवर आभाळ फाटलं. महाड, चिपळूण शहराला महापुराचा जबरदस्त तडाखा बसला. जनजीवन विस्कळीत झाले. सर्वत्र पुर ओसरल्या नंतर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. चिपळूण , खेड , महाड , कोकणात आलेल्या महापूरावर मात करण्यासाठी गावकर्‍यांच्या सहकार्यासाठी रविवार दि. २५ जुलै २०२१ रोजी सौ. स्नेहाताईचे  हिरानंदांनी मेडोज येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय येथून महाड मधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक सामग्री, औषधे, तांदूळ , तेलाची पिशवी , मीठ , आंघोळीचा - कपड्याचा साबण , कोलगेट , ५००० सॅनिटरी नॅपकीन , सुखे खाद्य जसे फरसाण, बिस्कीट जे ७/८ दिवस टिकेल , ब्लँकेट, चटई, टॉवेल , मेणबत्ती , ७०० पाण्याचे बॉक्स ,सॅनिटाइजर ,माचीस , फिनाइल , कपडे असा एक ट्रक पूर्ण भरून चिपळूण ,खेड, महाड , कोकणात रवाना करण्यात आला.         ह्यावेळी मा. श्री.संजय केळकर भाजपा आमदार ठाणे शहर, श्री.मनोहर डुंबरे - भाजपा गटनेते, नगरसेवक ठा.म.पा., सौ.स्नेहा रमेश आंब्रे - प्रभाग क्र. ४ ब नगरसेविका ठा.म.पा., श्री. रमेश बा. आंब्रे - भाजपा उपाध्यक्ष ठाणे शहर (जिल्हा) तसेच श्री. राजेश सावंत, श्री.आलोक  ओक, श्री.प्रशांत मोरे, सौ.मंजुळा माळेकर, हाईड पार्क सो. अध्यक्ष/सचिव व रहिवाशी, श्री. दिनेश बनसोडे, श्री.मुन्ना यादव, श्री.लालबहादूर गुप्ता, श्री.राहुल मोदवाडिया, श्री.दिनेश रशाळ, श्री.शुभम कुसाळकर हे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. 

Post a Comment

0 Comments