महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक महासंघाची ऑनलाईन सर्व साधारण सभा संपन्न

 

■महासंघाच्या अध्यक्षपदी सुभाष कलागते यांची निवड...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रविवारी महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक महासंघाची ऑनलाइन सभा उत्साहात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला देशाच्या सीमेवर जे जवान शहीद झाले तसेच कोरोना कालावधीत निधन पावलेल्या मृतात्म्यास दोन मिनिट स्तब्धता राखून श्रद्धांजली वाहण्यात आली.संघटनेचे सचिव कैलास गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. या सभेसाठी महासंघाचे माजी अध्यक्ष पी. बी. चौगुले यांची सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हंगामी सभा अध्यक्ष पी. बी. चौगुले यांनी सभेची रूपरेषा सर्वांना अवगत केली. मागील सभेचे कामकाज महासंघाचे कार्याध्यक्ष विलास आंग्रे यांनी वाचून दाखविला तसेच राज्य महासंघाचा त्रैवार्षिक अहवाल देखील त्यांनी सादर केला. त्यानंतर सभा अध्यक्षांनी राज्य महासंघाचा आढावा घेतला. महासंघाची पाठीमागील कार्यकारिणीची मुदत संपल्याने सभाध्यक्षांनी पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणीच्या निवडीचा प्रस्ताव ठेवला. उपस्थित राज्य महासंघाच्या सदस्यांमधून कोल्हापूरचे प्रतिनिधी सुभाष कलागते  यांची राज्य महासंघाच्या अध्यक्षपदी एक मुखी निवड झाली. कार्याध्यक्ष पदी गणेश नाक्तीसचिवपदी कैलास गायकवाडउपाध्यक्षपदी पुणे विभाग रवी किरण पिसेनाशिक विभाग मंगेश राणेविदर्भ विभाग जाधवमुंबई विभाग जोशी, सहसचिव पदी सोळंके व दीपक कोळी (पुणे विभाग)कोषाध्यक्षपदी उत्कर्ष मोरे तर संघटक पदी मोडक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच विविध विभागातून संचालकांची निवडही करण्यात आली.निवड झाल्यानंतर मावळते कार्याध्यक्ष विलास आंग्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नूतन कार्यकारणीचे अभिनंदन केले. तसेच मी जरी सेवानिवृत्त झालो तरी जोपर्यंत मी पेन्शन घेत राहीन तोपर्यंत महासंघाचे काम निःस्पृहपणे करत राहणार असल्याचे सांगितले. नूतन अध्यक्ष कलागते बोलताना म्हणाले, मी संघटना स्थापनेपासून नि:स्वार्थीपणे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काम केले आणि त्याचे हे फलित आहे. मी जरी अध्यक्ष असलो तर माझ्या महासंघातील प्रत्येक जण अध्यक्ष झाला आहे. भविष्यात राज्य महासंघ बळकट करून सर्वांना न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन.    या ऑनलाईन मीटिंगसाठी महासंघाच्या इतिहासात विक्रमी उपस्थिती होती. शेवटी गायकवाड यांनी सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानून सर्वसाधारण सभेची सांगता केली. दरम्यान नव निर्वाचित महासंघाचे अध्यक्ष सुभाष कलागते यांना पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी प्रत्यक्ष भेटून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments