नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार करणाऱ्या

 

बोगस पत्रकारा विरोधात बलात्कार व अट्रोसिटी चा गुन्हा दाखल...भिवंडी दि 29 (प्रतिनिधी ) परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेशी ओळख वाढवून तुला नोकरी लावून देतो असे सांगत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करून तीस जातीवाचक शिवीगाळ करून धमकविल्या प्रकरणी नारपोली पोलीसांनी एका बोगस पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे .मनोहर विशे वय 35,रा.पुर्णा असे या बोगस पत्रकाराचे नाव आहे.


          भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे राहणारा मनोहर विशे हा ग्रामीण भागात पत्रकार म्हणून वावरत असतानाच त्याने एका 35 वर्षीय पीडित महिलेस तुला नोकरी लावून देतो व तुझ्याशी लग्न करतो असे आश्वासन देवून पीडितेच्या इच्छेविरूध्द शारिरीक संबंध करून 2016 पासून वज्रेश्वरी व इतर ठिकाणी पीडितेवर  बलात्कार केल्याची व त्यानंतर पीडितेने नोकरी व लग्ना साठी तगादा लावला असता तिला जाती वाचक शिवीगाळ करीत धमकविल्या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी पीडितेच्या तक्रारी वरून मनोहर विशे या विरोधात भादवी कलम 376 (2) व अट्रोसिटी कायदा कलम 3(1) (डब्ल्यु) नुसार बलात्कार व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे .या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले हे करीत आहेत .

Post a Comment

0 Comments