चिपळूणच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेची ३ वैद्यकीय पथके रवाना महापौर व महापालिका आयुक्त यांचा विशेष पुढाकार


चिपळूण येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाला शुभेच्छा देताना महापौर नरेश गणपत म्हस्के सोबत महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी, डॉ. प्रमोद पाटील आदी. 


ठाणे ,  प्रतिनिधी  :  रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेची ३ वैद्यकीय पथके आज चिपळूणला रवाना करण्यात आली. याप्रसंगी महापालिका भवन येथे महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सर्व पथकाला शुभेच्छा दिल्या.


          

               राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे १५० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके महाडला यापूर्वीच रवाना झाली आहेत. यासोबतच चिपळूणची पुरपरिस्थिती पाहता तिथेही मदतकार्यासाठी पथके पाठवण्याची सूचना राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची ३ वैद्यकीय पथके आज रवाना करण्यात आलीत.           ही पथके महापालिका महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी व अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्या समन्वयाने मदत कार्य करणार आहेत. यामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी वैद्यकीय पथके पाठविण्यात आली आहेत. या पथकांसोबत रॅपीड अँटीजेन टेस्टींग कीटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॅाक्टर्स, नर्सेस, वॅार्डबॅाय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments