पुराच्या पाण्यात पोहणे पडले महागात दैवबलत्तर म्हणून तब्बल अडीच तासानंतर तरुणाचा वाचला जीव
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  टिटवाळ्यातील रिजेन्सी परिसरात राहणाऱ्या युवकाने पुराच्या पाण्यात पोहयाला उतरण्याचे धाडस अंगलटी आले होते. तब्बल अड्डीच तासानंतर पुराच्या पाण्यात वाहत असलेल्या युवकास अटाळीतील कोळी बांधवांनी आपल्या होडीच्या मदतीने वाचविल्याने त्यास जीवनदान मिळाले आहे.       टिटवाळ्यातील मांडा पश्चिमेत राहणारा युवक प्रशांत वाघमारे हा पोहण्यासाठी  रिजेन्सी परिसरात गेला. तो पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गुरुवारी सकाळी ११वा. सुमारास उतरला असता पुराच्या पाण्यात वाहत तो तब्बल अड्डीच तासानंतर अटाळी काळू नदीपत्रात अटाळी मानी परिसरातील स्थानिक कोळी बांधवांना आढळला.  विवेक कोनकरशैलेश पाटील यांनी त्याला आपल्या होडीच्या मदतीने पुराच्या पाण्यातुन बाहेर काढत जीवनदान दिले.


 प्रशांतचा जीव वाचविणार्या विवेक कोनकर यांचे घर पुराच्या पाण्यात बुडाले असताना देखील अशा परिस्थितीत दुसऱ्याचा जीव वाचविला व कोळीबांधव हा दर्याचा राजा असल्याचे  सिद्ध केले. भाजपा कार्यकर्ते शशिकांत पाटील,  सचिन पाटील लक्ष्मण ठाकूर यांनी पुराच्या पाण्यातुन बाहेर काढलेल्या भितीने घाबरलेल्या प्रशांतला चहापाणी दिलासा देत  पोलीसांकडे सर्पुद केले.

Post a Comment

0 Comments