बोलण्यात गुंतवून पैसे घेऊन पसार झालेल्या आरोपीला अटक
डोंबिवली ( शंकर जाधव ) मेडिकल दुकानात बोलण्यात गुंतवून दोन हजार रुपये घेऊन पसार झालेल्या  आरोपीला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे.गिरीश वामन गायकर ( २९, रा. गोळीवली, डोंबिवली पूर्व ) असे अटक आरोपीचे नाव आहे.ग्लोबल मेडिकल स्टोअर मध्ये गिरीश खरेदी करण्याच्या बहाण्याने गेला होता. तेथे बोलण्यात गुंतवून त्याने दोन हजार रुपये घेऊन पळाला.      मेडिकल दुकानदाराने विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.वपोनि संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे, पोलीस नाईक पाटणकर, कांगुणे, पोलीस हवा.नाईकरे,पोलीस कॉ.महाजन यांनी सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यामार्फत गिरीशला डोंबिवली पश्चिमेकडून अटक केली.आरोपी गिरीशने आतापर्यत चार दुकानात अशा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

Post a Comment

0 Comments