केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यसभेत ही गाजला गो कोरोना चा नारा


 

राज्यसभेत कोरोनावरील चर्चेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  राजकारण न करता कोरोनाचा एकजुटीने मुकाबला करण्याचे काव्यातून केले आवाहन..


मुंबई दि.22 - राज्यसभेत कोरोना रोखण्याबाबतच्या उपाय योजनांबाबत झालेल्या  चर्चेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सहभाग घेत आपल्या खास काव्यमय शैलीतून कोरोना रोखण्याबाबत राजकारण न करता एकजुटीने कोरोना चा मुकाबला करण्याचे आवाहन केले. 


            त्यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे गतवर्षी दिलेल्या त्यांच्या जगप्रसिद्ध गो कोरोना च्या नाऱ्याचा ही संसदेत पुनरुचार केला. ना रामदास आठवले यांच्या संसदेतील भाषणांमधील त्यांच्या कविता सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि सर्वांची मने ही जिंकतात. ना रामदास आठवले यांनी काल राज्यसभेत भाषणाच्या सुरुवातीला म्हंटलेली कविता..


कोरोना की आगयी है महामारी 

जग गायी दुनियाकी  जनता सारी

परेशान हो गयी थी गाव गावकी नारी 

मेरे ऊपर भी  आगयी थी ऍडमिट होणे की बारी


मोदीजी की आवाहन पर सभी देशवासीयोने बजायी थी ताली 

फिर सरकार को क्यू दे रहे हो गाली

कोरोना की ओ रात बहोत ही थी काली 

फिर क्यो हमारे सरकार को दे रहे हो गाली


कोरोना को मत डरोना 

कोरोना से मत हरोना

कोरोना को जलदी मारोना 

कोरोना  को बरबाद कोरोना


नरेंद्र मोदीजी ने कोरोना काल मे बहुत ही काम किया था अच्छा 

इसलीये खुश है गाव गाव की माँ और बच्चा 

नरेंद्र मोदी है माणूस सच्चा 

राजनीती मे नही है कच्चा 


अशी कविता सादर करून गो कोरोना चा नारा ना रामदास आठवलेंनी कसा दिला त्याबाबत माहिती सांगून कोरोना ची तिसरी लाट येऊ नये म्हणून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments