उत्तरकार्य विधीचा होणारा खर्च वाचवून त्या पैशातून करणार पूरग्रस्तांना मदत मारुती चंद्रकांत देशेकर यांच्या परिवाराने केला संकल्प
कल्याण , कुणाल म्हात्रे  : टिटवाळ्यातील  देशेकर कुटुंबायांनी उत्तर कार्याचा खर्च वाचवून कोकण पूरग्रस्त ५१ कुटुंबाना संसार उपयोगी भांडी देण्याचा संकल्प करून समाजापुढे अगळा आर्दश घातला आहे.  टिटवाळ्यातील उद्योजक सामाजिक,  कला,क्रिडासांस्कृतिकधार्मिक शैक्षणिकक्षेत्रात मौलाचे योगदान असलेले मारुती चंद्रकांत देशेकर यांचे वयाच्या ६३व्या वर्षी १९ जुलै  रोजी निधन झाले.'मरावे परी किर्तीरूपी उरावेह्या उक्तीप्रमाणे सामजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कै.मारुती देशेकर यांच्या उत्तरकार्याचा खर्च वाचवून त्या पैशातून मारुती देशेकर यांच्या स्मरणार्थ कोकणवासीय ५१ पूरग्रस्त कुटुंबाना भांडी दान देऊन त्यांचे सुपूत्र शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख विजय देशेकर यांनी एक वेगळा सामाजिक आदर्श समाजपुढं ठेवला आहे. सामजिक भावना मनात ठेवून त्यांनी घेतलेला हा निर्णयाने समाजापुढे आर्दश पायंडा पाडला आहे. उत्तर कार्य शोकसभा कार्यक्रम शनिवारी संपन्न होणार आहे. पुढील आठवड्यात कोकणपूरग्रस्त ५१ कुटुंबीयांना संसार उपयोगी भांडी देण्यात येणार असल्याचे विजय देशेकर यांनी सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments