महाड मधील पूरग्रस्तांना वुई आर फॉर यु चा मदतीचा हात


■पहिल्या फेरीतून साडेचार पाणी बाटल्या ,300 किट ,कपडे व इतर वस्तू केल्या वितरित.....


ठाणे , प्रतिनिधी  :  पुढे करुनी मदतीचा हात, पूरग्रस्तांना देऊया आपुलकीची साथ म्हणत आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्या वुई आर फॉर यू, नौपाडा युथ, अभिनय कट्टा, संगीत कट्ट्याच्या वतीने पहिली मदतफेरी महाडच्या दिशेने २७ जुलै ला रवाना झाली. मदतीच्या पहिल्या फेरीच्या टप्प्यावर जवळपास साडेचार हजार पाण्याच्या बाटल्या आणि २५०-३०० जीवनाशयक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. 


  

            प्रतिष्ठान च्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पाणी आणि जीवनाशयक वस्तू देण्याचे आवाहन केले होते. त्याला  अल्पावधीत दानशूर ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत निघालेल्या पहिल्या मदतफेरी साठी ट्रक भरून सामान महाड मध्ये पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले.           या कार्यात महाड येथील स्थानिक परंतु अभिनय कट्ट्याचा कलाकार रोहित सुतार याने मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे ज्या लोकांपर्यंत मदत पोहचली नव्हती. त्या लोकांना आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्या वुई आर फॉर यू च्या माध्यमातून थेट मदत वितरित करण्यात आली. त्यामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले.             प्रतिष्ठान च्या वतीने मदतीचे आवाहन केल्यावर पाहिली मदत फेरी रवाना होण्यासाठी हातात केवळ दीड दिवस मिळालेला असताना समस्त ठाणेकरांनी पुढाकार घेत आपली मदत अभिनय कट्टा कार्यालयाकडे पोहचती करत अनेकांनी आपला सहभाग नोंदवत या कार्याला शुभेच्छा दिल्या.           तसेच आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्या वुई आर फॉर यू, नौपाडा युथ, अभिनय कट्टा, संगीत कट्टा ,नौपाडा मधील स्थानिक नागरिक यांनी उपलब्ध कमी वेळेत जमा झालेल्या मदत रूपाने आलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करत त्यांचे किट बनवले ..इतकेच नाही तर ते सर्व सामान ट्रक मध्ये लोड करत या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.           तसेच या पहिल्या फेरीमध्ये महाड मध्ये जात  गोंडाळे ,नव्हेनगर, सांड हि खेडेगाव,आणि महाड एस टी स्टॅन्ड परिसर येथे   प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण नाकती यांच्या नेतृत्वाखाली गजानन परब, प्रशांत भरणे, महेश सुतार, लक्ष्मण पेडणेकर,विजय डावरे,आदित्य नाकती,कौस्तुभ राऊत, बाळा पावसकर, ऋषिकेश केदार, महाड मधील स्थानिक व अभिनय कट्ट्याचा कलाकार रोहित सुतार आदींनी सहभागी होत  थेट पूरग्रस्तांना मदत पोहचती केली.त्यामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्तांना अश्रू अनावर झाले होते.             प्रतिष्ठान च्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीची पहिली फेरी संपन्न झाली तरी दुसरी व तिसरी  फेरी ३१ जुलै तसेच ५ ऑगस्ट रोजी चिपळूण आणि सांगली / कोल्हापूर साठी रवाना होणार आहे.या फेरीत  "मायेची खिचडी"या अंतर्गत किमान एक महिना पुरेल असा अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.            तरी दात्यांनी तांदूळ, तूरडाळ, मुगडाळ ,तेल (चांगल्या प्रतीचे), कांदे, बटाटे, मीठ, चहा पावडर, साखर, बिस्कीट  तसेच टूथपेस्ट, टूथब्रश, फिनेल, डेटॉल, ब्लिचिंग पावडर, साबण, कपड्याचा साबण,  ब्लँकेट, चादरी, टॉवेल, सानिटरी नॅपकिन,मास्क, सॉनिटायझर,धूप, अगरबत्ती आदी वस्तू ४ ऑगस्ट २०२१ दुपारी १२ वाजेपर्यंत 


  

           आदित्य प्रतिष्ठान,ठाणे, अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान,भास्कर कॉलनी,नौपाडा ,ठाणे(प) येथे देण्याचे आवाहन आदित्य प्रतिष्ठान ठाणेच्या वुई आर फॉर यू च्या वतीने करण्यात आले आहे. या मदतीसाठी आपण इच्छेनुसार योग्य ती  रक्कमसुद्धा  खालील बँक खात्यावर पाठवू शकता.


 Aditya Pratishthan, Thane


 RTGS/NEFT/IFSC CODE: TJSB0000003


SB AC No.003110100059395


 G Pay 9819129277


अधिक माहितीसाठी संपर्क 


किरण नाकती 9819129277


आदित्य जाधव :84510 54548


संजय पवार : 84510 54543महाड मध्ये ज्या भागात मदत पोहचली नव्हती. त्या गावात थेट स्थानिकांच्या मदतीने जात पूरग्रस्तांना थेट मदत आदित्य प्रतिष्ठान आणि वुई आर फॉर यु च्या माध्यमातून देण्यात आली. 

Post a Comment

0 Comments