संत निरंकारी मंडळाचे मुंबई क्षेत्रीय प्रभारी भूपिंदर सिंह चुघ ब्रह्मलीन
कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  संत निरंकारी मंडळाच्या मुंबई विभागाचे क्षेत्रीय प्रभारी पूज्य भूपिंदर सिंह चुघ यांनी आज सकाळी आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन निराकार ईश्वरामध्ये विलीन झाले.  ते ६३ वर्षांचे होते.
         भूपिंदर चुघ यांचा जन्म दादरमुंबई मधील महान निरंकारी भक्त काहनसिंह यांच्या कुटुंबात झाला. जन्मापासूनच भक्तिमय संस्कारात वाढल्याने ते एक निस्सीम गुरुभक्त आणि मिशनचे महान सेवादार म्हणून उदयाला आले. कोवळ्या वयातच ते संत निरंकारी सेवादलात सहभागी झाले. त्यांच्यातील समर्पित सेवाभावना पाहून त्यांना सेवादल शिक्षक व त्यानंतर सेवादल संचालक या रुपांमध्ये दीर्घकाळ सेवा प्रदान करण्यात आल्या.  
    याशिवाय त्यांना ज्ञान प्रचारक’ रुपातही मिशनकडून सेवा देण्यात आल्या होत्या.  वर्ष २०१८ मध्ये त्यांना संत निरंकारी मंडळाच्या मुंबई क्षेत्राचे प्रभारी म्हणून जबाबदारी बहाल करण्यात आली जी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत निभावली. जगभर पसरलेल्या विशाल निरंकारी परिवारामध्ये ते दिलवरजी या नावाने प्रसिद्ध होते. 
      ते एक ओजस्वी वक्ताहिंदी आणि इंग्रजी गीतकार तसेच सुप्रसिद्ध कवि होते. त्यांच्या शेकड़ो भक्तिरचना सर्वदूर पसरलेल्या निरंकारी परिवारामध्ये मोठ्या आवडीने गायल्या व श्रवण केल्या जातात. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात ते कॉलेज प्राचार्य आणि एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होते. 

        त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि दोन नातू असा परिवार आहे. ते ब्रह्मलीन झाल्यामुळे संत निरंकारी मंडळाच्या मुंबई झोनची अपरिमित हानी झाली आहे. त्यांचे आदर्श जीवन येणाऱ्या पिढ्यांसाठी सदोदित प्रेरणादायी राहील.  

Post a Comment

0 Comments