अखिल भारतीय सेना, आई फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अखिल भारतीय सेना, आई फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना पार्श्वभूमीवर तळागाळातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत सामाजिक बांधलिकितुन अखिल भारतीय सेनाआई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे  विघार्थाना वाटप करण्यात आले. अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख माजी आमदार अरुण गवळीराष्ट्रीय सरचिटणीस आशा गवळी  यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय सेनाआई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कोल्हापुरवासीय शिवशाहु प्रतिष्ठान यांच्या अधिपत्याखाली १०० गरजू विद्यार्थ्याना शिक्षण उपयोगी साहित्याचे वाटप ठाणे जिल्हाप्रमुख राजेश दाखिनकर यांच्या हस्ते रविवारी ठाणे जिल्हा जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले.याप्रसंगी कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख सतीश नायडूकल्याण पुर्व विभाग प्रमुख श्रीरंग पुजारेकल्याण शहर युवा उपाध्यक्ष  रोहित शिंदेवॉर्ड अध्यक्ष  राजेंद्र कदम,  जयेश निकमसंतोष साळुंखेमनोज तायडे,  कैलास पवारसमाजसेवक अनिश विजयन,  सुरेश ढोणूक्षे,  विनायक साळुंखेरवी रायराम करईश्वर जोंधळेरमेश रेडेकरनिलेश दुबे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments