Header AD

मराठा क्रांती मोर्चा व मराठा बिझनेस फोरमतर्फे चिपळूण अनोखे कीटचे वाटप
चिपळूण (प्रतिनिधी) :  चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी मराठा क्रांती मोर्चा व मराठा बिझनेस फोरमतर्फे जवळजवळ ५०० कीटचे वाटप करण्यात आले. यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.          महापुराने त्यांचे जीवनच उद्ध्वस्त केले असून सर्वांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत याची गांभीर्याने दखल घेत चिपळूणमध्ये हात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यामध्ये मराठा क्रांती मोर्चा व मराठा बिजनेस फोरमतर्फे अनोखे किटचे वाटप करण्यात आले आहे.  या किटमध्ये झाडू, फिनेल बाॉटल, डस्टपॅन, दोरी, लादी साफ करण्याचे वायफर, डस्टर, कीशी, पाय खराब होऊ नये म्हणून मलम, ब्लिचिंग पावडर आदी साहीत्याचा समावेश करण्यात आला आहे.            अशा प्रकारचे कीट वाटप केल्यामुळे समाजातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.सदरचे सर्व सामान  प्रकाश देशमुख यांच्या हॉटेल अतिथीमध्ये एकत्र करून कीट बनवण्यात आले. व  तेथूनच सर्व ठीकाणी वाटप करण्यात आले.           ह्या मध्ये मराठा बिझनेस फोरमचे अध्यक्ष अॅड  शशिकांत पवार, कार्यकारी अध्यक्ष  अरुण पवार मुंबईहून समाजाचे पदाधिकारी  प्रसाद कदम,  राजेंद्र तावडे,  ऋषीकेश तावडे तसेच चिपळूणचे  प्रकाश देशमुख,  संतोष सावंत देसाई,  मनिष सुर्वे,  श्रीपाद चव्हाण,  राधेय शिंदे,  शैलेश शिंदे, सौ.शर्मिला गांधी,  प्रसाद शिर्के, सुबोध सावंत देसाई आदी पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मराठा क्रांती मोर्चा व मराठा बिझनेस फोरमतर्फे चिपळूण अनोखे कीटचे वाटप मराठा क्रांती मोर्चा व मराठा बिझनेस फोरमतर्फे चिपळूण  अनोखे कीटचे वाटप Reviewed by News1 Marathi on July 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads