भिवंडी शहरातील झेंडा नाका - वाणी आळी इथं दोन मजली घर कोसळले, वृद्ध दाम्पत्ये जखमी...

भिवंडी दि 27 (प्रतिनिधी ) परिसरात पावसाची रिमझिम सुरू असताना शहरातील झेंडा नाका - वाणी आळी इथं मंगळवारी  दुपारी 60 ते 70 वर्ष जुने दोन मजली घर कोसळले असून त्यामध्ये  वृद्ध दाम्पत्ये अडकले होते याची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून जवानांनी दोघा वृद्ध दाम्पत्यांना सुखरूप बाहेर काढले.               मात्र ते किरकोळ जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दल मलबा काढून आणखी कोणी आहे का याचा शोध घेत आहे. मुरलीधर काळे आणि सुनिता काळे असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत..

Post a Comment

0 Comments