पालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलनमनसेचा पाठिंबा.. आंदोलनाला राजकीय वास असल्याचा शिवसेनेचा आरोप...
डोंबिवली ( शंकर जाधव) दरवर्षी पावसाच्या पाण्यात समर्थनगर मध्ये पाणी साचत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात नांदिवली येथे नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाला मनसेचे पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेने मात्र आंदोलनाला राजकीय वास असल्याचा शिवसेनेचा आरोप केला आहे. आहे.या आंदोलनामुळे  शिवसेना आणि मनसेत झुंपल्याचे दिसते. 

      नंदिवली रस्त्यावरील तुळशीराम गंगेश्वर व्हॅली (गिरनार मेडिकल स्टोअर्स) समोरील मोकळ्या जागेत विभागातील नागरिकांनी ठिय्या आंदोलनासाठी गर्दी केली होती. समर्थ नगरयेथील महेंद्र काटकर,अमित परब व विभागातील उद्योजक सुभाष म्हात्रेमठाचे ट्रस्टी अनिकेत घमेंडी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते. 

    त्यांच्या या आंदोलनास पाठिबा दिला.या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरतजिल्हा सचिव प्रकाश मानेमनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष मिलिंद म्हात्रेमनसे विभाग अध्यक्ष राजेश म्हात्रेमनसे महिला सेना व इतर अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामील झाले होते. 

       यावेळी नागरिक सांगत होते कीमहापालिका प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारी करून देखील कोणता उपयोग होत नाही. पावसाळ्यात पाणी तुंबल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येथील तुंबलेल्या पाण्यामुळे मौल्यवान वस्तू निकामी होऊन आर्थिक नुकसान होते. घराची नासडी होते. चार-चार दिवस घरातून बाहेर पडता येत नाही. दुर्गंधीमुळे आरोग्य बिघडेलअनेक संसर्गजन्य आजारांना यामुळे आमंत्रण मिळत आहे. येथील हजारो नागरिकांना आता जगणे मुश्कील झाले आहे.

         पालिका प्रशासनाचे लक्ष परिसरातील समस्ये कडे वेधावे आणि त्यांची समस्या कायमस्वरूपी सुटावी अशी मागणी केली यावेळी मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले कीआमदार प्रमोद (राजू ) पाटील यांच्या आमदार निधीतून साचलेले पाणी फेकण्यासाठी दोन पंपांद्वारे तात्पुरता हा प्रश्न सोडवला जाईल व  एक कोटी रुपयांच्या आमदार निधीतून एक वेगळा नाला काढून नांदीवलीतील मोठ्या नाल्याला या विभागातील पावसाळ्यात जमणारे पाणी जोडले जाईल. 

        जर पंधरा दिवसात उत्तर मिळाले नाही तर निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन नागरिकांच्या वतीने छेडले जाईल असा इशारा दिला. या आंदोलनाबाबत डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांना विचारले असता ते म्हणाले,लोकशाहीत नागरिकांना आंदोलन करण्याच्या अधिकार आहे.

       समर्थनगर येथील नागरिकांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती.समर्थनगर येथे शिवसेनेने तात्पुरता पाण्याचा निचरा करण्याची सोय केली होती. साईबाबा मंदिर ते समर्थनगर पर्यत रस्त्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण आणि त्यात नाल्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.हे काम पावसाळयानंतर सुरु होणार आहे.आता मनसे आता श्रेय घेण्यासाठी पुढे आली आहे.

 


 

चौकट : 

 

ठिय्या आंदोलनाबाबत प्रशासनाला लेखी निवेदनाची प्रत स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आली. शहर अभियंता या आंदोलनाच्या वेळी लेखी निवेदन स्वीकारण्यास येणे आवश्यक होते.परंतु शहर अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांना नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी पाठविल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments