सहज कोणाची भेट झाली यावर पतंग उडवण्यात अर्थ नाही - भाजपा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे


■पक्ष कार्यकर्त्यांसह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरां सोबत केली चर्चा....


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  सहज कोणाची भेट झाली यावर पतंग उडवण्यात अर्थ नाही असे मत भाजपा नेते विनोद तावडे यांनी कल्याण येथे व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव व राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज कल्याण पूर्व व पश्चिम तसेच मोहना टिटवाळा मंडळअंबरनाथ आणि मलंगगड येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाणजिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळेकल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवारमाजी मंत्री जगन्नाथ पाटीलकल्याण मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रेमहिला जिल्हाध्यक्षा नगरसेविका रेखा चौधरी उपस्थित होते. भाजप-मनसे युतीवर पुढे ते म्हणाले कीसहज कोणाची भेट झाली यावर पतंग उडवण्यात अर्थ नाही. नाशिकमध्ये मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप ज्या पद्धतीने काम करतो आहेत्याच पद्धतीने काम करत राहील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. तसेच मनसे हा शत्रुपक्ष नाहीराज ठाकरेंनी परप्रांतीयांबद्दल भुमिका बदल्यास युतीबाबत विचार करु असंही भाजपडून सांगण्यात आलं होतं. मात्र मनसे - भाजप युती होईल किंवा नाही याबद्दल कुणीही ठोस असं मत अद्यापतरी मांडलेलं नाही.  तत्पूर्वी कल्याणमध्ये कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. विनोद तावडे यांनी कल्याण पश्चिम विधानसभेचे माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शहरातील शैक्षणिकसामाजिक व  राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विनोद तावडे यांची भेट घेत त्यांच्याशी शैक्षणिक विषयावर अनोपचारिक चर्चा केली.

Post a Comment

0 Comments