भारतीय स्केटिंग संघटनेच्या उपाध्यक्ष पदी पि. के. सिंग यांची निवड

 कल्याण , कुणाल  म्हात्रे : भारतीय स्केटिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी मुंबईचे पिके. सिंग यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारिणी सभासदांची निवड माजी न्यायाधीश मुलचंद गर्ग यांनी जाहीर केली.१९५५ नंतर प्रथमच रोलर स्केटिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये  महाराष्ष्ट्राला प्रतिनिधित्व मिळाले आहे. पुष्पेंद्र कुमार सिंग हे स्केटिंग ह्या खेळातील आंतरराष्ट्रीय पंच तसेच स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे गेली पंधरा वर्ष अध्यक्ष आहेत. स्केटिंग हा खेळ महाराष्ट्रात  वाढविण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. सिंग ह्यांनी १९८७ मध्ये रोलर स्केटिंग प्रशिक्षक म्हणून ह्या खेळात पदार्पण केले. त्यांनी एच आर कॉलेज ऑफ कॉमर्स इकोनोमिक्स मुंबई येथे डायरेक्टर म्हणून २५ वर्षे कार्य केले तेथून ते रिटायर्ड झाले आहेत त्याच बरोबर त्यांनी अनेक रोलर स्केटिंग चे राष्ट्रीय आणि अंतर  राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू निर्माण केले आहेत.

Post a Comment

0 Comments