शहाड येथे शिव भोजन केंद्र सुरु
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महाराष्ट्र राज्य शासनाच उपक्रमानुसार कल्याण मधील शहाड परिसरातील  गरीब  व गरजू  नागरिकांसाठी  शिव  भोजन आहार केंद्राचे उदघाटन माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.प्रेरणा सखी  महिला बचत  गटाच्या अध्यक्षा माया कटारिया यांच्या माध्यमातून शहाड बस स्टॉप जवळ मधुसुधन टॉवर येथे हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामुळे अनेक गरीब व गरजू लोकांना मदत होणार आहे. यावेळी माजी नगरसेवक गणेश  कोट, कॉंग्रेस प्रदेश सचिव प्रकाश मुथा, शिधा वाटप अधिकारी एकनाथ पवार, प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश  सावंत, उल्हासनगर जिल्हाध्यक्षा सोनिया धामी, रेखा हिरा, सुनीता देशमुख, मनीष  पगारे, तिरुपती रेशनिंग ऑफिसर सुधा जाधव, अमृता जगताप, दीनानाथ पाटील, विजय पारख, प्रताप बागरेचा, महेश बागरेचा, अनिल करपे आदी मान्यवर  उपस्थित होते.उपस्थित सर्वं मान्यवरांचा  सन्मान शिव भोजन केंद्राच्या संचालिका माया कटारिया यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. सी. कटारिया यांनी केले तर कार्यक्रमाचे  नियोजन मनीष कटारिया यांनी केले.

Post a Comment

0 Comments