ह प्रभागात अनधिकृत चाळीच्या बांधकामावर पालिकेची कारवाई
कल्याण  ,  कुणाल  म्हात्रे  :  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या  निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या  मार्गदर्शनाखाली ह प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्र. 53 मोठा गांवठाकुर्ली येथे अनधिकृत चाळीचे बांधकाम सुरु असल्याबाबतची तक्रार प्राप्त होताच या अनधिकृत चाळीचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली.           त्याचप्रमाणे 20 जोतेही मुळापासून निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. हि कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारीमहापालिकेचे पोलिस कर्मचारी व 1 जेसीबी मशिन यांचे मदतीने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments