महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकार विरोधात नागरिकांचा रोष वाढत असून केंद्र सरकारने गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. घर खर्च वाढले असून नागरिकांचे उत्पन्न कमी झाले आहे. मात्र यातून केंद्र सरकारच्या वतीने कोणतीही सवलत न दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पनवेल शहरच्या वतीने खारघर मधील शिल्पचौक याठिकाणी महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील आणि उपाध्यक्ष आर. एन. यादव यांच्या नेतृत्वाखाली शहरअध्यक्ष वलीराम नेटके यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनालात एम दास नारकरभाऊसाहेब लबड़ेकृष्णा मर्ढेकरमहेश राऊतराजश्री कदम आदींसह पदाधिकारी आणि महिला सहभागी झाल्या होत्या.       दरम्यान आजचे आंदोलन हे प्रतीकात्मक असून आगामी काळात गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलच्या किमती कमी न झाल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल तसेच नागरिकांच्या रोषाला केंद्र सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आर एन यादव यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments