बल्याणी टिटवाळा रस्त्यावर खड्ड्यांची चाळण


■रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास नगरसेविका नमिता पाटील यांचा आंदोलनाचा इशारा..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  बल्याणी  टिटवाळा रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली आहे. रायते पुलावर पाणी आल्यावर कल्याणहून मुरबाड दिशेने होणारी वाहनांची वाहतूक हि बल्याणी मार्गे टिटवाळा या रस्त्याने होत असते. असे असतानाही बल्याणी प्रभागातील रस्त्याचे प्राकलन तयार असुन देखील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. यामुळे या रस्त्याचा प्रश्न त्वरित मार्गी न लागल्यास स्थानिक नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


प्र. क्र.११ बल्याणी प्रभागाच्या शिवसेनेच्या नगरसेविका नमिता मयुर पाटील कुष्णी उत्पन्न बाजार समितीचे संचालकमाजी नगरसेवक मयुर सुरेश पाटील हे गेल्या  ५ वर्षांपासून बल्याणी प्रभागातील मुख्य डी पी रस्ते नव्याने बनविण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. "अविकसित भागासाठी ४ कोटी रु. निधीची तरतूद अर्थसंकल्पीय अंदाज केलेली असताना बल्याणी प्रभागातील मुख्य रस्ते बनविण्याबाबत प्राकलन तयार असताना देखील "लालफितीच्या दिरंगाई कारभारामुळे रस्त्याच्या पायाभूत सुविधा होत नाहीत हे दुर्दैवच म्हणावे लागेल.बल्याणी प्रभागातील मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांच्या रोषास सामारे जावे लागत आहे. रोज हजारो वाहनांची या रस्त्यावरून ये जा असते. रस्त्यावर खड्डे असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे  तातडीने बल्याणीतील मुख्य डी पी रस्त्याच्यी दुरुस्ती करीत नवीन रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा लोकशाही मार्गाने जन आदोलंन करण्यात येईल असा इशारा बल्याणी प्रभागाच्या स्थानिक नगरसेविका नमिता मयुर पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला  आहे.

Post a Comment

0 Comments