शिवसेना ठाणकर पाडा प्रभागाच्या वतीने पूरग्रस्तांना एक हात मदतीचा

कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कोकणात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे कोकणवासियांचे मोठे नुकसान झाले असून झालेल्या या हानीतून येथील नागरिकांना सावरण्यासाठी कल्याण मधील शिवसेनेच्या ठाणकर पाडा प्रभागाच्यावतीने एक हात मदतीचा देण्यात आला आहे. नगरसेवक मोहन उगले यांनी पुढाकार घेत कोकणवासियांसाठी मदत जमा केली असून हि मदत कोकणात रवाना करण्यात आली आहे.           मागील आठवड्यात झालेल्या अति वृष्टीमुळे कोकणात मोठ्या प्रमाणात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. पुरामुळे नागरिकांच्या घरांचे, अन्नधान्य आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या संकटातून सावरण्यासाठी कोकणातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 
            मुख्यमंत्र्यांच्या या आवहानाला प्रतिसाद देत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिमेतील शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी नागरिकांच्या मदतीने धान्य, कपडे, चादर, चटई, एक हजार किलो कांदे बटाटे, ७०० किलो कोबी, २० कॅरेट टोमेटो, ५०० किलो भाजी, ५०० किलो गहू तांदूळ, पाणी बॉटल आदी साहित्य जमा केले आहे. 
           हे साहित्य घेऊन नगरसेवक मोहन उगले कोकणात रवाना झाले असून इतर नागरिकांनी देखील कोकणवासियांना सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments