मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा निमित्त खड्डेमय रस्त्यावर भाजप आमदारांचे सदभावना यज्ञ करत उपरोधिक आंदोलन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा निमित्त खड्डेमय रस्त्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी  सदभावना यज्ञ करत उपरोधिक आंदोलन केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळी गावातील मुख्य रस्त्याची गेल्या पाच वर्षापासून  दुरावस्था आहे.                या रस्त्याच्या डागडुजी संदर्भात  भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सातत्याने शासना कडे पाठपुरावा केला सरकारकडे पाठपुरावा केला मात्र अद्यापही रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून नागरिक एस खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहेत याच्या निषेधार्थ आमदार गणपत गायकवाड यांनी आज या खड्डेमय रस्ता तसेच मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होम हवन करत उपरोधीक आंदोलन केलं.                 यावेळी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालक मंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे याचा भूमिकेचा निषेध नोंदवला .यावेळी आमदारांनी शिवसेनेच्या नेत्यां कडून जाणुन बुजून आमची काम अडवली जात असल्याचा आरोप केला.


Post a Comment

0 Comments