अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, अंतर्गत कोकण प्रदेश तिसरे राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य संमेलन उत्साहात संपन्न
कोकण , प्रतिनिधी  :  संतसंस्मरण भक्ति काव्यगजर काव्य संमेलन कोरोनाच्या पाश्वभूमी वर गुगल मीट या ॲपवर उत्साहात पार पडले. मंडणगड शाखा अध्यक्ष श्री. संदीप तोडकर यांनी संमेलनाच्या उपक्रमाचे माहिती दिली. गणेशवंदना, ईशस्तवन आणि राष्ट्रीय संस्थापक स्वर्गीय राजकुमार काळभोर यांना आदरांजली वाहून हा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा डॉ. अलका नाईक आणि अखिल भारतीय कोकण प्रदेशाध्यक्ष डॉ. रसनकुटे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


           यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे रिजनल डायरेक्टर, मुंबई, डॉ. वामन नाखले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभले त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेविषयी खूप चांगले उद्बोधन केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे यांचा ही सहभाग लाभला. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती शुभांगीताई काळभोर, यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून आपले मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. फुलचंदजी नागटिळक यांचीही उपस्थिती लाभून भक्तिमय वातावरणात अनेक रसिकांनी संतसाहित्याचे तसेच स्वलिखित रचनांचे काव्यगायन करून आनंदाचा आस्वाद घेतला. 


  

           आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा कार्यक्रम विशेष आयोजित करण्यात आला होता.या भक्तीकाव्य कार्यक्रमाचे व सूत्रसंचालन मंडणगड शाखा उपाध्यक्षा सौ. संगीता पंदिरकर यांनी केले. या निमित्ताने पंढरपुरातील सुखसोहळा घरातूनच सर्व भक्तांना अनुभवता आला असे वक्तव्य उपस्थितांनी केले. सौ. जयश्री नांदे यांनी सुश्राव्य ईशस्तवन करून कार्यक्रमाची सुरुवात केली, अवघी दुमदुमली पंढरी हा भक्ती गजर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांच्या घरातच दुमदुमला, वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे सर्वांनी मिळून पसायदान म्हणून काव्यसमेलंनाची सांगता झाली.           अशाप्रकारे कोरोना काळातील निराशेवर मात करून अतिशय भक्तीमय व आनंदी वातावरणात कार्यक्रमाचा समारोप झाला या वेळी प्रमुख पाहुणे डॉ वामन नाखले यांनी सर्वांचे आभार प्रगट करून पुढील वर्षी समोरासमोर भेटूनच काव्यसमेलंन साजरा करूया असे सांगून सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments