एमआयडीसी तील बंद कंपन्यांच्या जागा बांधकाम व्यावसायिकांना आंदण ; धरणे आंदोलनात कामगारांचा आरोप
डोंबिवली शंकर जाधव ) डोंबिवली एमआयडीसीतील बंद कंपन्यांच्या जागा खाजगी बांधकाम  व्यावसायिकांना कोणत्याही देणी न देता आंदण दिल्या जात असल्याचा आरोप बंद कंपन्यांच्या कामगारांनी केला आहे.या जागांवर स्थानिक महापालिका निवासी घरे बांधण्यासाठी कशी काय परवानगी देत आहे.असा प्रश्न आनंद सिंथोकेम कर्मचारी युनियनच्या कामगारांनी केलेल्या धरणे आंदोलनात उपस्थित केला.
   डोंबिवली पूर्वेकडील सागाव येथील होरीझोन सभागृहाजवळील आनंद सिंथोकेम लिमिटेड याबंद पडलेल्या कंपनीच्या जागेबाहेर कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले होते. आनंद सिंथोकेम कंपनी डोंबिवलीतील एमआयडीसीयेथे असून १९९८ साली स्थलांतरीत करण्यात आली होती.कंपनी बंद झाल्याचे कारण देऊन कंपनी स्थलांतर करण्यात आली होती.जागा विकल्यावर कामगारांची थकबाकी देण्यात येईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले होते.
          कामगारांना मात्र भविष्य निर्वाह निधीची क्षुल्लक रक्कम देण्यात आल्याचा आरोप या आंदोलनाच्या वेळी कामगारांनी केला.२०१९ साली कंपनीची जागा बांधकाम व्यवसायिकाला विकण्यात आल्याचे कामगारांना समजले.परंतु सदर कंपनीच्या जागेवर रहिवासी इमारती बांधण्याचे काम सुरु झाल्यामुळे कंपनीकडून फसवणूक झाल्याचे कामगारांना कळले.त्यांनी सोमवारी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन केले.सामाजिक कार्यकर्ता वंदना सोनावणे यांनी यावेळी कामगारांना पाठिंबा दिला.डोंबिवली एमआयडीसीतील बंद कंपन्यांच्या जागा खाजगी बांधकाम  व्यावसायिकांना कोणत्याही देणी न देता आंदण दिल्या जात असल्याचा आरोप बंद कंपन्यांच्या कामगारांनी केला आहे.

         या जागांवर स्थानिक महापालिका निवासी घरे बांधण्यासाठी कशी काय परवानगी देत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.डोंबिवली एमआयडीसी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले,याबाबत आम्हाला काहींही माहिती देण्यात आली नाही.त्यामुळे अधिक माहिती कशी देऊ शकतो.संपूर्ण माहिती घेऊनच बोलू शकतो.तर यावेळी मानपाडा पोलिसांनी आंदोलकर्त्यांना लवकरात लवकर आंदोलन आटोपते घेण्यास सांगितले.

Post a Comment

0 Comments