शिवसेना मध्यवर्ती शाखेतर्फे पूरग्रस्तांना डोंबिवलीकरां कडून मदत..१७ ट्रकांमधून ८० टन सामान रवाना ...

डोंबिवली (शंकर जाधव )  कोकण व  पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ओढवलेल्या पुरपरिस्थितीत दुर्दैवी नागरिकांना भरघोस मदत करा असे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले होते. त्यानुसार पालकमंत्री एकनाथ शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ८०  शिवसैनिकांना शहरातील नागरिकांकडून मदत घेण्याचे नियोजन केले.          त्यानुसार डोंबिवलीतील दानशूर लोकांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात विविध वस्तूंच्या रूपाने भरघोस मदत दिली. सुमारे  ८० टन सामानाने भरलेले १७  ट्रक शुक्रवारी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या मध्यामानातून  रवाना झाले.  सामानांच्या ट्रकना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर विनिता राणे यांनी भगवा झेंडा दाखवून नारळ वाढवून रवाना केले.
         मानपाडा रोडवरील शिवसेना मध्यवर्ती कार्याजवळील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास लांडगे यांनी पुष्पहार अर्पण केला तेव्हा शिवसैनिकांनी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला.      यावेळी माजी महापौर विनिता राणे, उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे, युवा अधिकारी दिपेश म्हात्रे, जेष्ठ नगरसेवस्क विश्वनाथ राणे, राजेश कदम, किशोर मानकामे, सुधीर पाटील, मुकेश पाटील, संदीप नाईक, संदीप सामंत, अजय घरत, संतोष चव्हाण, संजय पावशे, बाळा म्हात्रे, शहर संघटक मंगला सुळे, शहर संघटक किरण मोंडकर, सीमा अय्यर, ममता घाडीगावकर, गुलाब म्हात्रे, प्राजक्ता दळवी, लता नाटलेकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.            यावेळी गोपाळ लांडगे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीतील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी आणि डोंबिवलीतील दानशूर व्यक्तींनी विविध वस्तूंचे दान केले आहे. शिवसैनिक ते दान पूरग्रस्तांपर्यंत पोहचविण्याचं काम करीत आहेत. गॅसशेगडी, डाळ-तांदुळ, मीठ-तिखट ते ब्लॅंकेट अशा २९  वस्तूंचे पॅकेट गरजवंतना दिले जाणार आहे.
          जिथे गरज आणि संकट येथे तिथे शिवसेना पोहचते असेही लांडगे यांनी सांगितले. तर राजेश मोरे म्हणाले, डोंबिवलीतील दानशूर लोकांनी जी पूरग्रस्तांना मदत केली आहे ती खूप कौतुकपूर्ण आहे.

Post a Comment

0 Comments