भिवंडी - वाडा रोड वरील शेलार इथं इंधन दरवाढी निषेधार्थ काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन, केंद्र सरकार विरोधात केल्या घोषणा बाजी...

भिवंडी दि 4(प्रतिनिधी ) पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात   भिवंडी - वाडा रोडवरील शेलार इथं  काँग्रेसचे ठाणे जिल्हा सचिव पंकज गायकवाड यांच्या नेतृत्वा खाली कार्यकर्त्यांनी रविवारी   रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.          यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच केंद्रात सत्तारूढ असलेल्या मोदी सरकारने गरीबांना केवळ आश्वासने देवून झुलवत ठेवले आहे.या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणा बाजी केली.            दरम्यान काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले, त्यानंतर स्थानिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे...

Post a Comment

0 Comments