कल्याण पूर्व शिवसेनेचा मदतीचा ट्रक रत्नागिरीला रवाना


■नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने ६० टन साहित्य जमा...कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोकणात आलेल्या संकटा नंतर याठिकाणी मदतीचा ओघ वाढत असून सर्वच ठिकाणाहून नागरिक कोकणवासियांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. कल्याण पूर्वेत देखील नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने मातोश्री गुंजाई फाउंडेशन व कै. मधुकर कचरू म्हात्रे प्रतिष्ठान आणि कल्याण पूर्व शिवसेनेच्यावतीने कोकणवासियांना मदतीचे साहित्य घेऊन नगरसेवक महेश गायकवाड स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत रत्नागिरीला ट्रक घेऊन रवाना झाले आहेत.


             कोकणात मोठ्या प्रमाणात पुराने थैमान घातले असून अनेक घरे उद्ध्वस्त केली.पुराच्या पाण्याने नागरिकांच्या घरातील अन्नधान्य आणि इतर साहित्याची नासधूस झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेत मोठ्या प्रमणात कोकणवासियांसाठी मदत जमा करण्यात आली असून यामध्ये अन्नधान्य, कपडे इतर जीवनावश्यक वस्तू आदी  सुमारे ६० टन साहित्य जमा झाले आहे. हि मदत घेऊन नगरसेवक महेश गायकवाड आज रत्नागिरीला रवाना झाले आहेत.              शिवसेना हा पक्ष नेहमी ज्या ज्या ठिकाणी संकट असेल, ज्या ज्या ठिकाणी लोकं अडचणीत असतील तिथे सर्वप्रथम पोहोचणारा पक्ष म्हणजे शिवसेना आणि शिवसैनिक आहेत. कोकणात ज्या प्रमाणे आपण निसर्गाचा आनंद घ्यायला जातो, त्याप्रमाणेच आता कोकणवासीयांच्या मदतीसाठी देखील सर्व नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन नगरसेवक महेश गायकवाड यांनी केले आहे. यावेळी प्रशांत बोटे,सुमेध हुमणे, निलेश रसाळ, कृष्णा पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments