राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी विवेक विशे यांची नियुक्ती
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी विवेक विशे यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आणि  जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हि नियुक्ती करण्यात आली असून ह्या निवडीमुळे कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी परिवारात आनंदच वातावरण निर्माण झालं आहे.विवेक विशे यांच्या नियुक्तीने जिल्ह्यात राष्ट्रवादीला खूप मोठा फायदा होणार असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. विवेक विशे यांचा जिल्ह्यातील युवकांशी दांडगा संपर्क असल्याने राष्ट्रवादीला भविष्यात लाभ होईल अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी  युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांना न्याय मिळून देण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या पदावर नियुक्ती होताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील व माजी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन,  सर्व विधानसभा अध्यक्षआदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments