त्या तहानलेल्या चिमुकल्यासाठी आणि गरोदर मातेसाठी ते ठरले देवदूत


 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  आजच्या आधुनिक युगात माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय नुकताच कल्याणला आला आहे. सततच्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील सखल भागात पाणी साचले होते. अशावेळेस कंबरे इतक्या पाण्यात वाट काढत चिमुकल्यांना मदत केली तर घरात पाणी शिरल्यापासून बुधवार रात्रीपासून रस्त्यावर आसरा घेतलेल्या भुकेल्या गरोदर मातेला जेवण देऊन मदत केली आहे.  

           बुधवार पासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. घराबाहेर 20 ते 25 फूट पाणी साचल्याने बाहेर पडणे कठीण झाले होते. या कठीण परिस्थितीत कल्याणमधील शहाड स्टेशन परिसरात राहणारे खरे कुटुंब दुधाच्या शोधात होतं. 
              त्यांच्या घरातील दोन चिमुकल्या बाळांना भूक लागली होती. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांना आईच दूधही द्यायचं नव्हतं. त्यामुळे खरे कुटुंबियांची दुधासाठी शोधाशोध सुरू झाली. बाहेर पाणी आणि घरात चिमुकल्यांच्या भुकेची काळजीने ते व्याकूळ झाले होते. जवळची दुकान बंद होती.
 दूध न मिळाल्यानं चिमुकली रडू लागल्याने त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यांची पोस्ट काहींनी पहिली आणि सामाजिक कार्यकर्ते  महेश बनकर व त्यांचे मित्र कपिल निळजेकरप्रथमेश मणियारऋषिकेश नाईक यांचा नं मिळाला खरे यांनी त्यांना कॉल केला आणि सर्व प्रकार युवकांच्या लक्षात येता क्षणाचाही विलंब न करता ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करताकोणतंही वाहन उपलब्ध होत नसतानाकंबरेभर पाण्यातून वाट काढत ते आधारवाडी येथून दूध घेऊन खरे कुटुंबियापर्यंत पोहचले आणि अखेर चिमुकल्याचा आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू आले. 
               तर कल्याणच्या रेतीबंदर परिसरात बुधवारी मध्य रात्री वाजता पाणी शिरण्यास सुरवात झाल्याने घर सोडून चिमुकल्याना हाताशी घेऊन रस्त्यावर यावे लागले. अशातच पाणी कधी ओसारणार याची माहिती नाही. अशावेळी रस्त्यावर एक टेम्पोत आसरा घेतल्या गरोदर व्यक्तीतीला आणि तिच्या चिमुकल्याना जेवणाची मदत केली आहे.

Post a Comment

0 Comments