कल्याण डोंबिवली येथील पहिला फिरता दवाखाना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना...


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली येथील पहिला फिरता दवाखाना पूरग्रस्तांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी खेड आणि चिपळून येथे आज संध्याकाळी रवाना झाला. डोंबिवली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नाहर हाँस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने आ.राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभाग अध्यक्ष आणि नाहर मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटलचे संस्थापक दिनेश हिरामण पाटील यांच्या माध्यमातून या  आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.               यावेळी टिटी , इंजेक्शन ,फ्लू होउ नये यासाठी गोळ्या, डायरिया विरोधी लस आणि ओषधे या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे मनसेचे शहर सचिव अरुण जा़भळे यांनी सांगितले.  पूरग्रस्तांना भरघोस मदत करण्याचे आवाहन जनतेला मनसेच्या वतीने करण्यात आले.नाहर हाँस्पीटलच्या वतीने  पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती नाहरचे संस्थापक कुणाल गायकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments