केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट


उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षातर्फे बहुजन कल्याण यात्रा काढणार....

 

मुंबई दि. 31 - उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज भेट घेतली.उत्तर प्रदेश च्या  आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत रिपब्लिकन पक्ष युती करणार असून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला 10 जागा देण्यात याव्यात याबाबत ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली.यावेळी रिपाइं चे उत्तर प्रदेश चे प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता; जवाहर लाल; राहुलन आंबेडकर ; तरुण कुमार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.            उत्तर प्रदेशातील दलित मुस्लिम बहुजनांची रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याखाली एकजूट उभारणार आहोत. त्यासाठी संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढणार आहोत. येत्या दि. 26 सप्टेंबर रोजी गजियाबाद येथील युपी गेट जवळ रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन कल्याण यात्रेचा प्रारंभ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित होणार असून ही यात्रा संपूर्ण उत्तर प्रदेशात फिरून  दि. 18 डिसेंबर 2021 रोजी लखनौ च्या माता रमाबाई आंबेडकर पार्क मध्ये महारॅली द्वारे समारोप करण्यात येईल.त्या महारॅलीच्या जाहीर सभेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले;  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ; भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार आहेत. या रॅलीचे संयोजन रिपाइं चे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता यांनी केले आहे.           उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाच्या पाठी जी वोट बँक आहे ती वोट बँक मूळ रिपब्लिकन पक्षाचीच आहे.बसपा आधी उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्ष येथील दलित बहुजनांचे प्रतिनिधित्व करीत होता.आता पुन्हा आपण उत्तर प्रदेशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष उभा करणार आहोत. उत्तर प्रदेशातील बसपा ; भीम आर्मी चे शेकडो कार्यकर्त्यांनी आज रिपब्लिकन पक्षात प्रवेश घेतला असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी दिली.आज लखनौ येथे शिया समाज धर्मगुरू मौलाना कलबे जवाद यांची ना रामदास आठवले यांनी भेट घेतली.

Post a Comment

0 Comments