कोपर उड्डाण पुलासाठी `तारीख पे तारीख`... गणेशोत्सवा आधी पूल सुरु होणार


 
डोंबिवली ( शंकर जाधव ) शहरातील पूर्व पश्चिम विभागांना जोडणारा कोपर उड्डाण  पुलाचे लोकार्पणच्या तारखांना डोंबिवलीकर जनता कंटाळली आहे. आता कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनही जागे होऊन  पुलाच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाली आहे.पालिकेच्या मुख्य कार्यकारी अभियंता सपना कोळी यांच्या देखरेखीखाली काँक्रीटीकरण काम सुरू झाले आहे. पुलाचे लोकार्पण कधी होईल हे मात्र नक्की नाही. येत्या येत्या गणेशोत्सवाआधी कोपर उड्डाण पूल वाहतुकीस सुरु होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

         गेली दोन वर्षे कोपर उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद आहे. पावसाळ्यात शहरातील डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाली  असूनखड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.पश्चिमकडील जुना डोंबिवली रस्तामहात्मा फुले रस्ता,बावनचाळ रस्तामहाराष्ट्रनगरगरिबाचावाडा रस्तारेतीबंदर रोड आदी रस्त्यांची चाळण झाली आहे. 

           मुळात कोपर उड्डाण पूल बंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पूर्वपश्चिम विभागाला जोडणारा नवीन जोशी हायस्कूल उड्डाणपूल असला तरी तो अरुंद असून पुलाच्या दोन्ही टोकावरील मार्गावर खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.त्यामुळे वाहतूक को़डीचा त्रास होत आहे. 

      तसेच पूर्वेकडून-पश्चिमेकडे प्रवास करण्यासाठी वाहन चालकांना कसरत करावी लागत असून शहरातून बाहेर पडण्यासाठी तासनतास खर्ची पडत आहे.मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालिका प्रशासनाने कोपर उड्डाण पुलाच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात केली. 
            आता काँक्रिटीकरणाचे काम साधारणपणे दोन दिवस चालणार असून ते २०० घनमीटर इतकी व्याप्ती असेल. स्लॅब आणि दोन्ही बाजूच्या कठड्याचे कॉंक्रिटीकरण झाल्यानंतर डांबरीकरण करण्यासाठी २८ दिवस थांबावे लागेल अशी माहिती मुख्य कार्यकारी अभियंता सपना कोळी यांनी दिली.कोपर उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. 
          शहरातील विकास कामे अर्धवट अवस्थेत असल्याने आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्तांना याबाबतची आठवण करून दिली होती. सबब कोपर उड्डाण पूल लवकरात लवकर पूर्ण करा अशी नागरिकांची मागणी होत असूनआता तारीख पे तारीख नको अशी चर्चा शहरात होत आहे. जर पालिका प्रशासनाने याकडे लक्षपूर्वक काम केल्यास गणेशोत्सवाआधी कोपर उड्डाणपूल वाहतुकीस खुला होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments