कल्याण डोंबिवलीत ८७ नवे रुग्ण तर १ मृत्यू १०३ रुग्णांना डिस्चार्ज

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ८७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.


 

आजच्या या ८७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३८ हजार ८३४ झाली आहे. यामध्ये ८२२ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३५ हजार ७५८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 




आजच्या ८७  रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०कल्याण प – २८डोंबिवली पूर्व – डोंबिवली पश्चिम – २२मांडा टिटवाळा – तर मोहना येथील २ रुग्णाचा समावेश आहे.

 


Post a Comment

0 Comments