उंबर्डे कचरा प्रकल्प तात्पुरता बंद आधार वाडी डम्पिंग वर टाकण्यात येतोय कचरा
कल्याण , कुणाल  :  मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण मधील उंबर्डे येथे असलेल्या महापालिकेचा कचरा प्रकल्प पाण्याखाली गेला होता. यानंतर हा कचरा प्रकल्प तात्पुरता बंद करण्यात आला असून सध्या आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यात येत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.


पुराच्या साचलेल्या पाण्यामुळे या प्रकल्पातील कचरा हा उंबर्डे येथील शेतीमध्ये पसरला होता. यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. उंबर्डे येथील कचरा प्रकल्प बंद करण्यासाठी उंबर्डे येथील ग्रामस्थ आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस चिंतामण लोखंडे हे पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. असे असतांनाच  आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करून उंबर्डे येथील कचरा प्रकल्पावर प्रमाणापेक्षा जास्त कचरा टाकला जात असल्याचा आरोप येथील गावकऱ्यांनी केला होता.याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित असतांना येथे मात्र कचरा साठवला जात असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे असून यामुळेच अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने हा कचरा संपूर्ण गावातील शेतीमध्ये पसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर उंबर्डे कचरा प्रकल्प तात्पुरता बंद करण्यात आला असून येथे टाकण्यात येणारा कचरा हा आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे.   तसेच उंबर्डे येथील प्रकल्पावर असलेल्या कचऱ्याची जोपर्यंत विल्हेवाट लावली जात नाही तोपर्यंत हा कचरा प्रकल्प बंद ठेवण्यात येणार असून गावकऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार असल्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिले असल्याची माहिती चिंतामण लोखंडे यांनी सांगितले. तसेच गावकऱ्यांच्या संघर्षाचा एक प्रकारे विजय असल्याचे देखील ते म्हणाले.   

Post a Comment

0 Comments