भिवंडी तालुक्यातील कुहे - चिंबीपाडा इथं बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह 21 तासा नंतर शोधण्यात यश...

भिवंडी दि 24 (प्रतिनिधी ) तालुक्यातील कुहे - चिंबी पाडा परिसरातील  बंधाऱ्यात शुक्रवार  सायंकाळी  पोहाण्यासाठी आलेल्या सहा मुलापैकी शहरातील रोशनबाग इथं राहणारे  मुजीब  शेख वय 17, तर तौसीब  कुरेशी  वय 17 ही दोन मुले वाहून गेल्याची घटना  घडली होती  याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली असताना रात्री अग्निशामक दल, पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली मात्र अंधार असल्याने शनिवारी सकाळी  शोधकार्य सुरु करण्यात आले होते.           पाण्याला प्रवाह असल्याने दोघे वारणा नदीच्या पत्रात कुठेतरी अडकून बसल्याची  शक्यता होती, त्याप्रमाणे दोघांचा  शोध घेण्यात येत येत असताना  पाण्याला जास्त प्रवाह असल्याने काही तरुण पाण्यात उतरले मात्र त्यांना पाण्यातील दगडी  लागल्याने दोघे जखमी झाल्याने शोधकार्याला अडचणीत येत होत्या त्यामुळे अथक प्रयत्नाने स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी दोघांचेही मृतदेह 21 तासाने  शोधन्यात यश मिळवले आहे या घटनेमुळे रोशन बाग परिसरात शोककळा पसरली आहे  गेल्या वर्षी याच ठिकाणी एका नगरसेवकाच्या भावाचा पाण्यात बुडून  मृत्यू झाल्याची घटना घडली होती..

Post a Comment

0 Comments