Header AD

इकबाल कासकरला भिवंडी न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची एनसीबी कोठडी

भिवंडी दि 25  (प्रतिनिधी )  कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर यास नुकताच एनसीबी ने ठाणे कारागृहातून ताब्यात घेतले असून भिवंडी तालुक्यात अटक केलेल्या दोन आरोपींशी त्याचे संबंध असल्याने या प्रकरणी भिवंडी न्यायालयात हजर केले असता इकबाल कासकर यास एक दिवसाची एनसीबी कोठडी ठोठावण्यात आली आहे .
एनसीबी विभागाने 17 जून रोजी तालुक्यातील पडघा पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर शब्बीर उस्मान शेख व निजामुद्दीन अहमद ताजा यांना अटक करून त्यांच्या जवळून 12 किलो चरस हस्तगत केला होता .            या प्रकरणी चौकशी दरम्यान अटक आरोपींचे इकबाल कासकर बरोबरचे कनेक्शन समोर आल्याने एनसीबी ने खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या इकबाल कासकर याचा ताबा ठाणे कारागृहातून घेत त्यांना भिवंडी येथील न्यायाधीश एम एम माळी यांच्या न्यायालयात हजर केले असता एनसीबीच्या वकिलांनी इकबाल कासकर यास 27 जून पर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु न्यायालयाने फक्त एक दिवसाची पोलीस कोठडी दिली असून उद्या इकबाल कासकर यास ठाणे विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे .
इकबाल कासकरला भिवंडी न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची एनसीबी कोठडी इकबाल कासकरला  भिवंडी न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची एनसीबी कोठडी Reviewed by News1 Marathi on June 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads