डोंबिवलीत युवा सेनेच्या वतीने १ रुपायात पेट्रोल दरवढी करणाऱ्या केंद शासनाचा निषेध
डोंबिवली ( शंकर जाधव ) पेट्रोलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. वाढणाऱ्या या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल परवडेनासंच झालं आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्ये आजच्या घडीला 102 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने पेट्रोलची विक्री होत आहे.आज डोंबिवलीत केंद्र शासनाचा निषेध करित उषमा पेट्रोल पंंप येथे नागरिकांना १रुपयात पेट्रोल उपलब्ध करुन देण्यात आले.             कल्यााण युवा सेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी डोंबिवलीत 1 रुपया पेट्रोल देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पेट्रोल भरण्यासाठीी.अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, युवा सेना अधिकारीदिपेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, उपस्थित होते.             इंधनाचे अवाक्याबाहेर गेलेले दर पाहता आता सर्वच स्तरांतून त्याचा निषेध करण्यात येत असून, हे दर नियंत्रणात आणण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. याच दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्ताने म्हणजेच  सकाळी १० ते १२ या वेळेदरम्यान डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर पेट्रोल अवघ्या एक रुपयात एक लीटर या प्रमाणानं विकलं गेले.              कल्याण युवा सेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी डोंबिवलीत १ रुपया पेट्रोल देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

Post a Comment

0 Comments