Header AD

'श्वासासाठी , एक झाड' एमआयडीसीत ' जिवलग ' चा उपक्रम

 
डोंबिवली ( शंकर जाधव )  करोना काळात आँक्सीजन चे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे एमआयडीसीत कधीकाळी बहरलेल्या वनश्रीला पुन्हा तिचे वैभव प्राप्त करुन देण्याचा निश्चय जिवलग मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.रविवारी या संस्थेच्या वतीने एमआयडीसीत भागात रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात आली.यावेळी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मदने उपस्थित होते.
 


              यावेळी पोलीस निरीक्षक  मदने म्हणाले कि, करोना काळात ख-या अर्थाने आपल्याला आँक्सीजनची कमतरता जाणवली.झाडांमुळे येथील आँक्सीजन मध्ये वाढ होईल.एमआयडीसी भागांत अजुनही प्रदूषण असल्याने जास्तीत झाडे लावणे गरजेचे आहे. झाडांमुळे शुध्द हवा येथील रहिवाशांना मिळेल. नेहमी राजकीय व्यक्ती व्रुक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होत असतात. परंतु जिवलग संस्थेने पोलिसांच्या हस्ते व्रुक्षारोपण केल्याचे समाधान जिवलग मित्र परिवाराच्या सदस्यांनी  व्यक्त केले.           हि मोहीम राबविताना संस्थेच्या मधील प्रत्येक व्यक्ती ने प्रत्येकी एका रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी असे निश्चित करण्यात आले आहे. एमआयडीसीतील बस स्थानकाच्या शेवटच्या थांब्याच्या चौकातील रस्त्याच्या कडेला २० रोपांची लागवड करण्यात आली.  "श्वासाची कमी झाडांमुळे हमी " असा नारा यावेळी जिवलगच्या वतीने देण्यात आला.

'श्वासासाठी , एक झाड' एमआयडीसीत ' जिवलग ' चा उपक्रम 'श्वासासाठी , एक झाड'  एमआयडीसीत ' जिवलग ' चा उपक्रम Reviewed by News1 Marathi on June 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads