Header AD

५३रुपयात बेड चार्जेस` संकल्पनेची राज्यात अंमल बजावणी करण्याची राज्यपाल कोश्यारी यांच्या कडे नाहर रुग्णालयाची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाच्या टाळेबंदीमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कोरोनाच्या उपचारार्थ पैशाची चणचण निर्माण झाली आहे, अश्या गोरगरीब रुग्णांना डोंबिवली येथील  नाहर मल्टीस्पेशिलिटी रुग्णालयाने अवघ्या ५३ रुपयात बेड चार्जेस (`( डॉक्टर, नर्सिंग,आर.ए.ओ.चार्जेस ) उपलब्ध करून दिले आहेत.    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त नाहर मल्टीस्पेशिलिटी रुग्णालय संस्थापक तथा मनसे कल्याण शीळचे विभागाध्यक्ष दिनेश पाटील यांनी सात दिवसांसाठी ५३ रूपयांत बेड सेवा देत आहेत. डोंबिवली आणि परिसरातील अनेक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून राज्यातील इतर खाजगी कोविड रुग्णालयात अश्या प्रकाराची रुग्णसेवा उपलब्ध यासाठी राज्यपाल कोश्यारीकडे नाहर रुग्णालयाची मागणी करणार आहे.याबाबत माहिती देण्यासाठी रुग्णालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.     यावेळी डॉ.वैभव सिंगडॉ.हरिश साळुंखे,डॉ. कुणाल गायकर आदी उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापक जांभळे म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी खाजगी रुग्णालयामध्ये ५ बेड गोरगरीब रुग्णांसाठी अल्प दरात पलब्ध करून द्यावेत अशी मागणी रुग्णालयाचे व्यवस्थापक अरूण जांभळे यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १४ जून पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना २१ जून र्पयत सुरू राहणार आहे.या सात दिवसांच्या कालवधीत येणाऱ्या सर्वच कोविड रुग्णांना ही सेवा देण्यात येणार आहे.कोरोना काळात गरीबांना थोडा फार का होईना दिलासा मिळावा यासाठी आम्ही ही योजना आणली आहे.यापूर्वी ही रुग्णालयांनी अनेक प्रकारे रुग्णांना मदत केली आहे.        ही संकल्पना राज्यात राबविण्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी यांनी सर्व खाजगी रुग्णालयांना आवाहान केले. तर एखाद्या रुग्णालयात शंभर बेड आहेत.त्यातील पाच बेड कोरोना रुग्णासाठी कमी दरात उपलब्ध करून देण्यास काहीच हरकत नाही. नाहर रु ग्णालयात ५३  रूपये बेड दरामध्ये डॉक्टरांचे तपासणी दरबेड दर नर्सिंग यांचे दर लावण्यात आले आहेत. अतिदक्षता विभाग आणि वॉर्ड अशा दोन्हीसाठी ही सेवा देण्यात आली आहे. सध्या कोविडचे दोन रूग्ण या योजनेखाली उपचार घेत आहेत असे सांगितले.        डॉ.वैभव सिंग म्हणालेकोरोना काळात सर्वानी कोरोना नियमावलीचे तंतोतत पालन केल्यास तिस:या लाटेत रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल. ज्येष्ठांपासून लहान मुलांना र्पयत सर्वाचेच लसीकरण होणो आवश्यक आहे. कोरोना महामारी नियंत्रित आणण्यासाठी सरकारने डॉक्टरांचे मार्गदर्शन घेऊन काम केले पाहिजे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आम्ही त्यांच्या किंमती रुग्णाला परवडणाऱ्या ठेवल्या होत्या. कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडर किंवा औषधोपचारांचा काळाबाजार हा कोणताही डॉक्टर अथवा रुग्णालय करीत नव्हते. यावर नियंत्रण ठेवणो सरकारचे काम होते.

५३रुपयात बेड चार्जेस` संकल्पनेची राज्यात अंमल बजावणी करण्याची राज्यपाल कोश्यारी यांच्या कडे नाहर रुग्णालयाची मागणी ५३रुपयात बेड चार्जेस` संकल्पनेची राज्यात अंमल बजावणी करण्याची राज्यपाल कोश्यारी यांच्या कडे नाहर रुग्णालयाची मागणी Reviewed by News1 Marathi on June 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads