अति धोकादायक इमारतीच्या निष्कासन कारवाईस प्रारंभ

 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिमेकडील`` प्रभाग क्षेत्रामधील वसंत निवास ही अतिधोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे.१९६६ पासूनची ही इमारत सदर तळ मजला अधिक तीन मजली आहे. या इमारतीमध्ये ५४ भाडेकरू आणि १६  व्यावसायिक गाळे होते.
         सदर इमारतीस २०१७  पासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत होती. त्यातील व्यावसायिक गाळयांमध्ये वापर सुरू असल्यामुळे त्यांचे पाणी कनेक्शन कट करून व त्यांचा वापर बंद करून आणि दोन रहिवासी यांना घर खाली करण्यास सांगितले. प्रभागक्षेञ अधिकारी सुहास गुप्ते यांनी २  जेसीबी पोकलेन, २ ब्रेकर व महापालिकेचे ३० कामगार यांच्या मदतीने ५ दिवसात सदर इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments